Wednesday 4 July 2018

झालं गेलं होऊन गेलं
तुमचं आम्ही काय वाकड केलं

उगाच तुम्ही लफडा केला
आमचा त्यात खोपडा गेला
आता भरल्या डोळ्यां वर बघतु
गेल्या येळेवर हसतु

झालं गेलं होऊन गेलं
तुमचं आम्ही काय वाकड केलं

नात्यात मन रमना
भरल्या डोस्क्यान काम व्हईना
पडून राहतोय उपडा
अंगावरचा गळून पडलाय कपडा


झालं गेलं होऊन गेलं
तुमचं आम्ही काय वाकड केलं

मातीचा वासचं येतुया रोगट
कोणी बी कोणाशी साधतोय लगट
आजू-बाजूसनी बघतुया सांड
आमच्या आईची तुम्ही कामून बनवली रांड...

तुम्ही म्हणताय आता
झालं गेलं होऊन गेलं
आहो पण आयघाल्यांनो
तुमचं आम्ही काय वाकड केलं...
@molDS

Wednesday 27 June 2018

ये ख़ामोशी कैसी 
हर जगह 
कोई आवाज होती क्यों नहीं 
गिरे  शीशा, 
या गिरे कोई इंसान 
कम्बख्त आवाज नहीं आती 
आखिर मांजरा  क्या है ?

 कोई रोता है ,
तो हसी की आवाज आती है। 
कोई अकेला हो ,
तो लोग उसके पास होते है। 
आखिर है क्या ये ?

न जाने क्यों ऐसा लगता 
कोई सोने जा रहा है 
धीरे धीरे सुनना बंद कर रहा है 
हसना बंद कर रहा है 
बस सांसे चली जा रही है 
लेकिन कब तक ??
-@molds

Wednesday 18 April 2018

बाप आपुला महाराष्ट्र
अन माय आपुली मराठी

बाप आपुला महाराष्ट्र
अन माय आपुली मराठी

इकडं गेले कि म्हन्तेत कसं
"आमच्या कोकणाचं गोवा करूचो नाय "

अन मंग हिकडच्या तिकडच्या रांगड्या गप्पा मारीत
म्हणतेस कसं 
"का बोलून ऱ्हायला  बे "


लगीच उन्हाच्या  त्रासांन डोक्याचा घाम पुसत
"बोल ना बाप्पा "


नंतर हळूच तिखट  कमी करत
गालातल्या गालात हसत
नाकात भरगच्च श्वास घेत
म्हणतात काय
"आज वरणात  मीठ जरा कमीच पडलय बरं  का "


बाप आपुला महाराष्ट्र
अन माय आपुली मराठी ....... 

Tuesday 27 February 2018


द्वंद्व 
कधीतरी पेन उचलताना 
हळूच एखादा ठिपका कागदावर उमटतो 
मग सुरु होतो शब्दांचा प्रवास 
एका मागून एक 
अशी असंख्य शब्द 
थरथरत्या हातांनी कागदावरती 
येत राहतात 
थांबावं आस वाटलं तरी 
गिरक्या घेत घेत त्यांचं फिरणं थांबत नसत 
प्रत्येक गिरकीला एक वेगळं वळण 
वेगळ्या वाटा 
पुन्हा त्याच जागेवर येण्याचा खटाटोप 
त्यातून आलेलं अस्वस्थपण  
उतरत राहत कागदावर 
कागद भरगच्च 
वजनदार झालेला 
उचलायला जरा जास्तच भारी झालेला 
मग थोडा जोर लावत 
थोडंस कण्हत 
जीवाचा आटापीटा करत 
त्याला भिरकावून देणं 
शांतता....... 
Amolds

Monday 12 February 2018

काल मी जरा हट्टी झालो
तुझा आठवणी जरा दूर फेकायचा म्हणून जरा दूर जाऊन आलो
खरं सांगू कि खोटं?
खोटंच सांगतो
दिसला रास्ता धावत सुटलो
थकलो तरी थांबलो नाही
कदाचित इतका थकलोय कि थकवा जाणवतच नाही
हा हा हे आपलं असाच
तर बोलतोय काय??
गेलो दूर जरा गावापासुन
आणि एका टेकडीवर थांबलो
मग एक एक आठवणी काढू लागलो
"आपल्याच बरं का"
खूपच मज्जा आली आस भिराकावून देणं छान असत म्हणे
काल ते अनुभवलं कि
एका पाठो - पाठ एक आठवण
हि उंच धरून खाली फेकायची
मग तिचा आवाज येतोय का ते कान देऊन ऐकायचं
आणि हो खूप छान आवाज असतो आठवणींना
अग कानाला ऐकूच येत नाही काही
पण आवाज थेट काळजालाच भिडतो यार
भिडतो-बिडतो कसलं कवी सारखं वाटत
हे सगळं ते आवाजामुळेच
हळू हळू एक एक करत सगळ्या आठवणी फेकून दिल्या
आणि ओरडून सांगितलं परत यायचं नाही
"माझं मन काय तुमच्या बापाचं घर नाही "
मग त्या काही बोलतात का हे कान देऊन ऐकायला लागलो
पण आवाज काही आलाच नाही
हो आलं लक्षात
मगाशीच बोललो ना आठवणींचा आवाज कानाला येतच नाही
काळजाला भिडतो ना
मग त्यामुळे मोक्कार काळीज जड-बिड झाल्यासारखं वाटत
आणि हे सगळं खोटंच सांगितलंय बरका
उगा तुला खरं वाटायचं
मग पुन्हा म्हणशील चल आठवणी गोळा करू
त्यासाठी पुन्हा तुझा सोबत जगावं लागेल
आणि मग पुन्हा तुझ्यावर प्रेम जडेल
जडू देऊ  म्हणतेस ??
बरं बघतो......
- Amolds

Friday 9 February 2018

सांगु कसा , मी बोलू कसा
आठवण मला येते तिची
माझी गं  तू ,
तू माझी गं
ये ना फिरुनी पुन्हा अशी गं
तगमग या जीवाची होतीया किती
सांगू कसा , मी बोलू कसा
आठवण मला येते तिची   .

जवळ ये ना
मिठीत घे ना
अबोल प्रीत जरा बहरू दे ना
पुन्हा एकदा पहिल्यासारखं हसून बघ ना
तुझी आस आत लागलीये किती
सांगू कसा , मी बोलू कसा
आठवन मला येते तिची  .

वसंत प्रेमाचा जरा फुलू दे ना
चंदेरी डोळ्यांमध्ये पुन्हा भुलू दे ना
ओठांशी ओठांना पुन्हा बोलू दे ना
तुझी ओढ लागलीये किती
सांगू कसा, मी बोलू कसा
आठवण मला येते तिची  .

Wednesday 3 January 2018

होऊद्या दंगल आता
उचला जातीच्या तलवारी
करा एकमेकांवर वार
फक्त वार करून थांबू नका
जीव घेतल्याशिवाय कोणाला सोडू नका
वाहुद्या रक्ताचे पाट
होऊद्या जमीन लाल
नंतर पोरक्या झालेल्या
लेकरांना विचारा

" तुही जात काय? "

त्याच्यावरही दया दाखवू नका
निरागस लेकराला तिथंच कापा
कारण आपल्या भावना भडकावाल्यात ह्यांनी
पण त्याला मारल्यावर मात्र
आपल्या लेकराला कुशीत घेऊ नका
भडकलेल्या हृदयाला
मायेचा पाझर फुटू देऊ नका......